Bhima Koregaon : कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिन; राज्यभरातून लाखो भीम अनुयायी दाखल

राज्यभरातून लाखो भीम अनुयायी दाखल
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bhima Koregaon) पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिन साजरा होतोय. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात.

येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी केली असून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. विजय स्तंभाला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला असून त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोजन केले आहे.

Summary

  • कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिवस साजरा

  • राज्यभरातून लाखो भीम अनुयायी दाखल

  • विजय स्तंभाला रंगीबेरंगी फुलांची सजावट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com