Bhima KoregaonTeam Lokshahi
महाराष्ट्र
Bhima Koregaon: भीमसैनिकांकडून विजयस्तंभाला मानवंदना; लाखोंची उपस्थिती
विजयस्तंभ परिसरात फटाके फोडून भीम वंदना
चंद्रशेखर भांगे | पुणे : पुण्याजवळ असलेल्या कोरेगाव-भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी येतात. आज पहाटेपासूनच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली. 205 वा अभिवादन सोहळा मोठ्या उत्सवात पार पडत आहे.
कोरेगाव भीमा येथे आज विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो भीमसैनिक उपस्थित राहिले आहेत. विजयस्तंभ परिसरात फटाके फोडून भीम वंदना केली. व भीम घोषणांनी विजय स्तंभ परिसर दुमदुमून गेला होता. आज दिवसभरात या ठिकाणी लाखो भीमसैनिक या विजय स्तंभाला अनुवादन करणार आहेत.
दरम्यान, पुण्यासह राज्यातील ७० जणांना रविवारी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच समाजामध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे.