Bhima Koregaon : पुण्यातील भीमा कोरेगावमध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह; अभिवादनासाठी हजारोंची गर्दी
पुण्यातील भीमा कोरेगावमध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजय स्तंभास भेट दिली होती. कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले.
दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून साजरा करण्यात येतो. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सोमवारी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहणार आहे.
भीमा- कोरेगाव परिसरातील गर्दीवर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. साडेतीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.