Bhimashankar Temple
BHIMASHANKAR TEMPLE TO REMAIN CLOSED FOR THREE MONTHS FOR DEVELOPMENT AND SAFETY WORKS

Bhimashankar Temple: मोठा निर्णय! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिने बंद, कारण काय?

Temple Development: पुण्यातील भिमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिने बंद राहणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप, पायरी मार्गाचे बांधकाम आणि इतर कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. ही अंमलबजावणी ९ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल, मात्र महाशिवरात्रीच्या (१२ ते १८ फेब्रुवारी २०२६) आठवडाभराच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले राहील.

जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थांच्या २३ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वानुमते झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी लाखो भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, सुरक्षित प्रवेश-निर्गमन, गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार चालू राहतील. मात्र, भाविकांना थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ वगळता इतरांना कडक निर्बंध असतील. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम ठेवून सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

Summary
  • भिमाशंकर मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिने बंद राहणार.

  • विकास कामे व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय.

  • महाशिवरात्री (१२–१८ फेब्रुवारी) दरम्यान मंदिर खुले.

  • दर्शन बंद असले तरी नित्य पूजा व धार्मिक विधी सुरू राहणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com