Kolhapur Bhondu Baba
महाराष्ट्र
Kolhapur Bhondu Baba : कोल्हापुरातील चुटकीवाला भोंदूबाबाला ठाण्यातून ताब्यात घेतलं
कोल्हापूरच्या उपनगरातील चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकला.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur Bhondu Baba) कोल्हापूरच्या उपनगरातील चुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकला. अनेक नागरिकांची फसवणूक केल्यामुळे या भोंदूबाबाचा पोलीस शोध घेत होते.
याच पार्श्वभूमीवर आता चुटकीवाला भोंदूबाबाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चुटकी वाला भोंदू बाबा अर्थात सनी भोसले याला ठाण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तीन दिवसांपासून या भोंदूबाबाचा तपास सुरु होता. चुटकी वाला भोंदू बाबांने कोल्हापूरमध्ये अनेकांना गंडा घातला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
चुटकीवाला भोंदूबाबा कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
चुटकी वाला भोंदू बाबा अर्थात सनी भोसले याला ठाण्यातून पोलिसांनी घेतलं ताब्यात
तीन दिवस सुरू असणाऱ्या तपासाअंती करवीर पोलिसांची कामगिरी
