भाऊ बीजेच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकावर भाऊ बहिणीची मोठी गर्दी

भाऊ बीजेच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकावर भाऊ बहिणीची मोठी गर्दी

Published by :

अनिल साबळे | औरंगाबाद | भाऊबीज हा बहीण-भावाचं नात घट्ट करणारा सण आहे. दीपावली मधील महत्वाचा भाग असलेल्या भाऊबीज म्हणजे बहीण ही आपल्या लाडक्या भाऊ रायाला दीर्घ आयुष लाभो म्हणून औक्षण करून देवाला भावाची भरभराटी होवो असे साकडे परमेश्वरा घातले जाते. या सणाच्या पार्श्वभूमीवर सासरी गेलेल्या आपल्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी प्रत्येक भाऊ जात असल्याने सिल्लोड येथील बस स्थानकावर आज सकाळ पासून प्रवाशाची मोठी गर्दी पहावयास मिळाली आहे.

भाऊबीज हा सण संपूर्ण परिवार एकत्र येवून साजरा करतो. कोरोना काळात मात्र सासरी असलेल्या बहिणीला शक्य झाले नाही. आणि यंदा कोरोना आटोक्यात आल्यानंतर नियमावली शिथिल करण्यात आली, अखेर बहिण भावाकडे जाण्यास निघाली परंतु बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. लहान बाळ व हातात पिशवी, आणि भावाच्या हातात पिशवी सोबत लहान भाचे मंडळीना घेऊन बस मध्ये जातानाचे चित्र दिवस भर बस स्थानकावर पहावयास मिळाले आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाचे दिवस भर तारामळ पाहायला मिळाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com