राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यातील कॉलेजबाबत मोठा निर्णय, सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

Published by :
Published on

कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यात ओमायक्रॉनचा देखिल शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून 15 फेब्रुवारीपर्यंत अकृषीय विद्यालये देखिल बंद राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील कॉलेजबाबत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये ही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील विद्यापीठातील, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात  येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. महाविद्यालये बंद केली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. 

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उदय सामंत यांनी सांगितले की, राज्यातील  फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे, सर्व विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय  काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com