मोठा निर्णय! भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर 'या' भागातील धबधबे पर्यटकांसाठी बंद

मोठा निर्णय! भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर 'या' भागातील धबधबे पर्यटकांसाठी बंद

भिमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रामध्ये येत्या 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भिमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रामध्ये येत्या 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश वन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.

भिमाशंकर परिसरात वर्षभर देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते, पावसाळ्यात पर्यटकही मोठ्या संख्येने निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात. सध्या या धबधब्यांतील पाण्याला जोर असून, पोहताना पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो.

भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील डोंगरदऱ्यांमधील जंगलवाटा पावसामुळे निसरडया झाल्या आहेत, अनेक ठिकाणी गवत वाढल्याने वाटा पुसल्या गेल्या आहेत, अशा परिस्थिती अपघाताची, धुक्यामुळे वाट हरविण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन अभयारण्यातील सर्व निसर्गवाटा 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेल्या ठिकाणांची नावे

चोंडीचा धबधबा - खोपीवली नियतक्षेत्र

न्हाणीचा धबधबा - पदरवाडी जवळ

सुभेदार धबधबा - नारीवली नियतक्षेत्र

घोंगळ घाट नाला - खांडस ते भिमाशंकर मार्ग

शिडी घाट - पदरवाडी ते काठेवाडी पुर्णत: बंद

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com