मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोठी बैठक; अनिल देशमुख दाखल
सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेल्या तीन तासापासून मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठ्कीतली माहिती आपल्या समोर येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेल्या तीन तासापासून बैठक सुरु आहे. या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आधीपासून बैठकीत उपस्थित होते.आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. मात्र लवकरच या बैठकीतला निर्णय आपल्या समोर येणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर उद्या सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात बैठक सुरु आहे, त्यानंतर उद्या सह्याद्रीवर बैठक होणार असल्याची माहिती समोर आलीय,