महाराष्ट्र
MPSC स्पर्धेपरीक्षाबाबत महत्वाची बातमी; विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती होणार!
MPSC अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि विविध ग्रुप A पदांसाठी 320 रिक्त जागांची मोठी भरती; पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.