Indian Railway Ticket : भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; कन्फर्म तिकिटांवरील तारीख विनाशुल्क बदलता येणार

कन्फर्म तिकिटांवरील तारीख बदलता येणार
Published by :
Team Lokshahi

थोडक्यात

  • भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा बदल

  • कन्फर्म तिकिटांवरील तारीख बदलता येणार

  • कन्फर्म तिकिटावर दुसऱ्या दिवशीही प्रवास करता येणार

(Indian Railway Ticket ) भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. कायम गर्दी, वेटिंग लिस्ट आणि सणासुदीच्या काळात तिकीट मिळविण्याच्या समस्या पाहता हा बदल प्रवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी प्रवासाची तारीख बदलावी लागल्यास प्रवाशांना तिकीट रद्द करून नवीन तिकीट घ्यावे लागत होते. या प्रक्रियेत केवळ वेळ आणि पैसा नाही, तर मानसिक त्रासही वाढायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर प्रवासी आपल्या कन्फर्म तिकिटावर प्रवासाची तारीख थेट ऑनलाइन बदलू शकतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या बदलासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यामुळे प्रवाशांना अनावश्यक आर्थिक नुकसान वाचणार आहे.

दररोज कोट्यवधी प्रवाशांच्या प्रवासाशी निगडित असलेल्या भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्रणालीत हा मोठा बदल आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय आणखी महत्त्वाचा ठरतो. रेल्वे विभागाकडून लवकरच हा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन निर्णयामुळे प्रवासी तिकीट रद्द न करता त्यांच्या तारखा बदलू शकतील ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com