Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल; पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागात उमेदवाराचे अर्ज घेणार भरून
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी आता सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व ४१ प्रभागात उमेदवाराचे अर्ज भरुन घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात मनसे सोबत युती आणि महाविकास आघाडीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्याने शिवसेनेची एकट्याने लढण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत असून आघाडी किवा युती न झाल्यास शिवसेना सर्व 165 जागांवर लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व ४१ प्रभागात उमेदवाराचे अर्ज घेणार भरून
आघाडी किवा युती न झाल्यास शिवसेना सर्व १६५ जागावर लढणार
