Parth Pawar : कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; पार्थ पवार यांचं नावं वगळून अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल
थोडक्यात
कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली
कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट
पार्थ पवार यांचं नावं वगळून अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल
(Parth Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पार्थ पवार यांचं नावं वगळून अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यामुळे चर्चेत आलेली खरेदीदार कंपनी अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्री बाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्याची माहिती मिळत आहे.
