आरक्षणाचा बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

आरक्षणाचा बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाची माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत. राज्यात आरक्षणावरून वातावरण चांगलच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रा दौरा सुरु आहे.

हिवाळी अधिवेशनात आरक्षणावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या सरकारच्या हालचाली दिसून येत आहे. बिहारप्रमाणं महाराष्ट्रातही 75 टक्के आरक्षण होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com