नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या संपन्न

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या संपन्न

Published by :
Published on

महाराष्ट्र भूषण डॉ. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेले स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले आहे. या स्वच्छता अभियानात असंख्य नागरीकांनी सहभाग नोंदवला होता.

श्रीमत दासबोध या ग्रंथाच्या निरुपणातुन समाज घडवणारे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 1 मार्च 1922 रोजी झाला.त्यांनी लाखो लोकांना व्यसनमुक्त केले, त्यांचे संसार सावरले, समाजाला अंधश्रध्देच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम केले. यासोबतच समाजमन घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
नानासाहेबांचे हे कार्य आता त्यांचे चिरंजीव पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेबांचे चिरंजीव रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचे स्वच्छता अभियान आहे.

महाराष्ट्र भूषण डॉ. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. हे स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com