Kalyan - Dombivli : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक; भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kalyan - Dombivli) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा एकच अर्ज असून भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्रमांक 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी यांचा एकच अर्ज आल्याने जवळपास त्यांची उमेदवारी बिनविरोध झाल्याची माहिती आहे मात्र कागदपत्र पडताळणी होणार असून यानंतरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक
भाजपाने आणखी एक खातं उघडलं
भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध
