‘वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही’

‘वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही’

Published by :
Published on

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. मेहबूब शेख यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला असून वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही अशा शब्दांत उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट केलं असून सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला आहे.

टि्वटमध्ये काय आहे?
'वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही', असं टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com