धक्कादायक! भाजप शहराध्यक्ष बियाणी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक! भाजप शहराध्यक्ष बियाणी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

विकास माने | बीड : बीडचे भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून बियाणींनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भागीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळेस डॉक्टरांनी बियाणींना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. भागीरथ बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भागीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अदयाप समजू शकलेले नाही.

या घटनेची माहिती कळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी झाल्या आहेत. व रुग्णालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रीतम मुंडे कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली.

दरम्यान, पत्रकार, व्यापारी, महसूल, पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे भगीरथ बियाणी हे सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com