Municipal Elections
NASHIK BJP CLASH: INFIGHTING BETWEEN PARTY LEADERS ERUPTS AHEAD OF MUNICIPAL ELECTIONS

Maharashtra Politics: नाशिकमध्ये भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, भाजप उमेदवार बाळा शिरसाठ आणि देवानंद बिरारी यांच्यात वाद

Municipal Elections: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात अंतर्गत कलह उफाळला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महापालिका निवडणुकीसाठी नाशिकमध्ये राजकीय तणाव वाढत असताना प्रभाग क्रमांक ३१ मध्ये भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांत सिडको विभागीय कार्यालयातच हाणामारी झाली. देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट यांच्यातील या मारामारीमुळे कार्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. बिरारी यांच्या पत्नी वंदना यांना अपशब्द वापरल्याचा आरोप असून, शिरसाट यांनी याला नकार दिला आहे.

सिडको विभागातील प्रभाग ३१ मध्ये भाजपाकडून देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट हे दोघेही एकाच गटातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, भाजपाने बाळकृष्ण शिरसाट यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवानंद बिरारी आणि माजी नगरसेविका वंदना बिरारी हे सिडको विभागीय कार्यालयात आले. तिथे आधीच शिरसाट उपस्थित होते.

दोघे समोरासमोर आल्यानंतर शिवीगाळ सुरू झाली आणि वाद वाढून झटापट झाली. एकमेकांना मारहाण करताना वंदना बिरारी वाद सोडवण्यासाठी गेल्या, तेव्हा शिरसाट यांनी त्यांना अपशब्द वापरले, असा आरोप बिरारी गटाकडून करण्यात आला आहे. शिरसाट यांनी मात्र वंदना यांना उद्देशून अपशब्द वापरला नसल्याचा खुलासा केला आहे.

Summary
  • प्रभाग ३१ मधील भाजप कार्यकर्त्यांत थेट हाणामारी

  • उमेदवारी नाकारल्यामुळे वाद चिघळला

  • सिडको कार्यालयात गोंधळ, पोलिस तपास सुरू

  • भाजप नेतृत्वाकडून स्पष्टीकरणाची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com