“हे सरकार बलात्काऱ्यांना राजाश्रय देतंय”
बलात्काऱ्यांना राजश्रय देण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणला जात आहे. मात्र हा कायदा महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांनाच पाठीशी घालण्यासाठी होत असल्याचा त्या म्हणाल्या. वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाणे महापालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचऱ्यासोबत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी अश्लील वर्तन केले असल्याचे प्रकरण त्यांनी उजेडात आणले असून हे एक प्रकरण नसून महाराष्ट्रात आशा प्रकारे महिलांवर अत्याचार होत असून ठाण्याच्या प्रकारणाबरोबरच सर्वच प्रकरणात भाजप महिलांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.