Amaravati Voilence | पोलिसांच्या विनंतीमुळे अमरावती दौरा पुढे ढकलला : किरीट सोमय्या

Amaravati Voilence | पोलिसांच्या विनंतीमुळे अमरावती दौरा पुढे ढकलला : किरीट सोमय्या

Published by :
Published on

त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या अमरावतीतील मोर्चात मोठा हिंसाचार झाला होता. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांनी तो दौरा रद्द केला आहे.

त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या हाकेला प्रतिसाद देत हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चातही दगडफेक, तोडफोडीसारख्या घटना घडल्या. त्यामुळे अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते. पण आता पोलिसांनी विनवनी केल्यामुळे दौरा पुढे ढकलल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com