OBC Reservation | …तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल: पंकजा मुंडे
ओबीसी आरक्षणावरील राज्य सरकारच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या याचिके संदर्भात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता येत्या 6 जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारने व्यवस्थित बाजू मांडली असेल तर येत्या 6 जुलै रोजी ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांमधील ओबीसी समाजातील सदस्यांची निवड रद्द केल्याने पोटनिवडणुकी संदर्भातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या २०० जागा खुल्या वर्गातून भरण्याकरिता जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.