BEST credit society polls Result : बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांचे पॅनल आघाडीवर
(BEST credit society polls Result) 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी उत्साहात पार पडली. पावसाचा अडथळा न मानता तब्बल 83 टक्के सभासदांनी मतदान करून या निवडणुकीबद्दलची उत्सुकता अधोरेखित केली. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची ही निवडणूक केवळ पतपेढीपुरती मर्यादित नसून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.
या निवडणुकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व मनसे यांनी हातमिळवणी करून उभे केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ आणि भाजप समर्थित श्रमिक उत्कर्ष सभा तसेच समर्थ बेस्ट कामगार संघटना यांच्यात थेट लढत झाली.
याच पार्श्वभूमीवर आता बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांचे पॅनल आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. 'सहकार समृद्धी पॅनल' आघाडीवर असून ठाकरे बंधूंच्या विरोधात आघाडीवर आहे. भाजपच्या प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात हे पॅनल असून ठाकरे बंधू एकत्र येऊनही निवडणुकीत पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.