Watch Video; लेकीच्या लग्न विधींवेळी भाजप आमदाराचा तुफान डान्स; कोरोना नियमांचे उल्लंघन

Watch Video; लेकीच्या लग्न विधींवेळी भाजप आमदाराचा तुफान डान्स; कोरोना नियमांचे उल्लंघन

Published by :
Published on

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा एक तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते तुफान डान्स करताना दिसत आहे. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या विधींच्या वेळी आमदार महेश लांडगे यांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला.मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात आमदारांनी भंडारा उधळत कोरोनासंबंधी सर्व नियम पायदळी तुडवल्याने टीका होत आहे. या सोहळ्यात काही अपवाद वगळता आमदारांसह अनेक जण विनामास्क वावरत असताना व्हिडीओत दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com