भाजप खासदार उदयनराजे भोसले कोरोना पॅाझिटीव्ह

भाजप खासदार उदयनराजे भोसले कोरोना पॅाझिटीव्ह

Published by :
Published on

अमोल धर्माधिकारी | भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदयनराजे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीतून परतल्यानंतर खासदार उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. उदयनराजे यांना पुण्यातील रुबी हॉल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून उदयनराजे यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे. दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पना राजे यांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com