BJP Nagpur | ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

BJP Nagpur | ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Published by :
Published on

ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी नेते व नागरिक आक्रमक झाले. त्यामुळे भाजपाने साथ देत राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली.

ओबीसी समर्थनार्थ भाजपाने हाक दिल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज नागपुरमध्ये चक्काजाम आंदोलन होत आहे. आंदोलन स्थळी नेते व कार्यकर्ते पोहचले असून आंदोलनाला नागपुरात सुरवात झाली आहे.

आंदोलनाला कोठेही गालबोट लागु नये किंवा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणुन आंदोलन स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे आंदोलन स्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे. त्याच प्रमाणे आंदोलनात महीलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होताना दिसतोय.

भाजपाचे हे आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी नसुन आरक्षणाच्या आड सरकार अस्थिर करण्यासाठी आहे. सत्ता नसल्याने भाजपा असे कृत्य करत आहे असे आघाडीच्या नेत्यांनकडून सांगण्यात येते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com