लोकसभा निवडणुकीत तटकरेंचा कडेलोट करणार; असं कोण म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत तटकरेंचा कडेलोट करणार; असं कोण म्हणाले?

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपाने गेली महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत भाजपाने गेली महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपचे मेळावे सुरू असून थेट तटकरे यांच्यावर टिका केली जात आहे.

मंत्री आदिती तटकरे विधानसभेसाठी निवडणून आलेल्या श्रीवर्धनमध्ये भाजपने दोन मेळावे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सुनील तटकरे यांच्यावर सडकून टिका केली. मागील वर्षी अनंत गीते यांचा कडेलोट केला यंदा सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार.

तसेच तुम्ही महायुतीत सहभागी झालात ही युती वरिष्ठ पातळीवर मान्य असेल पण आम्ही मानत नाही. त्यामुळे रायगडमध्ये भाजपचाच खासदार आणणार. असे थेट आव्हान भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी तटकरेंना दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com