BJP - Shivsena : 6 महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं ठरलं: युती असलेल्या महापालिकेत दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP - Shivsena ) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.
आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. यातच काल अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचे पाहायला मिळाले. तर 6 महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं ठरलं असून युती असलेल्या महापालिकेत दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नागपूर, जळगाव या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढणार असल्याचं ठरलं आहे. तर जळगावमध्ये भाजप 46, शिवसेना 23 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Summery
6 महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचं ठरलं
युती असलेल्या महापालिकेत दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार
मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढणार
