Dombivli : पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने; कोयत्याच्या हल्ल्यात चार जण जखमी, निवडणूक प्रचाराला हिंसक वळण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dombivli) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी, विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच आता निवडणूक प्रचाराला हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप केलं. सोमवारी रात्री तुकारामनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. यावेळी जोरदार हाणामारी झाली.
ही घटना पॅनल क्रमांक 29 मधील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडली असून या पॅनलमध्ये भाजपकडून कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, मंदार टावरे, अलका म्हात्रे तर शिवसेना शिंदे गटाकडून रूपाली म्हात्रे, रंजना पाटील, नितीन पाटील, आणि रवी पाटील, हे उमेदवार रिंगणात आहेत. या घटनेत भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील. आणि रवी पाटील. यांच्यासह आणखी दोन जण जखमी झाले आहेत.
Summary
डोंबिवलीत पुन्हा निवडणुकीचा राडा
पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने
कोयत्याच्या हल्ल्यात चार जण जखमी
