Chhatrapati Sambhajinagar BJP
Chhatrapati Sambhajinagar BJP

Chhatrapati Sambhajinagar BJP : छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजांना शांत करण्यात भाजप यशस्वी

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar BJP ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

तसेच उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत कोणी राजीनामा दिला तर कोणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली.काही जणांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर आता उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र आता भाजपच्या नेत्यांनी नाराज असलेल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्यामध्ये मोठे यश प्राप्त करायला सुरुवात केली आहे. सात टक्क्यांपर्यंत नाराजांची मनधरणी यशस्वी झाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजांना शांत करण्यात भाजप यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराजी

  • नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांना धरलं धारेवर

  • भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com