Devendra Fadnavis : नागपूरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार; 'या' तारखेला भाजपकडून फडणवीस यांची प्रकट मुलाखत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर आता नागपूरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
मोठ्या जाहीर सभा ऐवजी छोट्या सभांवर भर असल्याची माहिती मिळत आहे. नागपुरात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार असून 8 जानेवारीला नागपूरात देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार अशी माहिती मिळत आहे. पालिका निवडणुकीत भाजपचे काय व्हिजन असणार याबद्दल मुख्यमंत्री मुलाखतीतून मत मांडण्याची शक्यता आहे.
Summary
नागपूरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार
8 जानेवारीला भाजपकडून फडणवीस यांची प्रकट मुलाखत
भाजपचा मोठ्या जाहीर सभांऐवजी संवादावर देणार भर
