Akkalkot : अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Akkalkot) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले.
सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर आता अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
फटाक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोटमध्ये झळकले असून अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच मिलन कल्याणशेट्टी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर शहरभर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
अक्कलकोट मध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात
फटक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष
मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये झळकले अभिनंदनाचे बॅनर
