BJP Yuva Morcha
BJP Yuva Morcha

BJP Yuva Morcha : आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन

पोलिसांसमोर कायदा- सुव्यवस्था राखण्याचे आव्हान
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(BJP Yuva Morcha) मालाड-मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आपणास संपविण्याची धमकी दिली, असा आरोप राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर आज आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असून भाजप युवा मोर्चा हे आंदोलन करणार आहे. मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता पोलिसांसमोर कायदा- सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असणार आहे. मालाड मालवणी येथील म्युनिसिपल शॉपिंग सेंटर समोर हे आंदोलन करण्यात येणार असून आज दुपारी 4 वाजता आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Summery

  • आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

  • भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन

  • मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com