Devendra Fadnavis : महायुतीच्या विजयानंतर आता मुंबईचा महापौर कुणाचा? फडणवीसांनी स्पष्ट सांगितले...
Devendra Fadnavis On BMC Election Result :राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, 15 जानेवारीला झालेल्या मतदानाचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या सगळ्यात मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष होते. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने येथे जोरदार तयारी आणि प्रचार केला होता. निकालानंतर मुंबईत महायुतीची सत्ता स्थापन होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपाने विजयाचा जल्लोष करत कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत हा विजय जनतेचा विश्वास असल्याचे सांगितले. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी प्रामाणिकपणे काम करून नागरिकांची सेवा करावी, असा संदेशही त्यांनी दिला.
महापौरपदाबाबत थेट नाव जाहीर न करता फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर असेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा आणखी रंगली आहे.

