Diwali Firecrackers
Diwali Firecrackers

Diwali Firecrackers : फटाके फोडताना 'या' कोणत्या गोष्टी टाळाल? फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

  • मदतीसाठी 101 आणि 1916 एक क्रमांक केले जाहीर

  • इमारतीत जिन्यावर किंवा टेरेसवर फटाके फोडू नयेत

(Diwali Firecrackers ) दिवाळीला सण जवळ आला आहे. सगळीकडे उत्साह पाहायला मिळत असून सर्वजण दिवाळी सणाच्यानिमित्ताने तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे.

बाजारपेठा दिवाळीच्या वस्तूंनी सजल्या आहेत.यासोबतच फटाके खरेदी करण्यासाठी देखील दुकांनांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर आता फटाके वाजवताना खबरदारी घेण्याचे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. दिवे लावताना व फटाके फोडताना काळजी घ्यावी.

फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 101 व 1916 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

फटाके फोडताना कोणत्या गोष्टी टाळाव्या?

इमारतीत जिन्यावर किंवा टेरेसवर फटाके फोडू नयेत

आगपेटी किंवा लायटरचा वापर टाळावा

पडद्याजवळ दिवे लावू नका

गॅस पाईपलाईन किंवा वाहनाजवळ देखील फटाके फोडू नका

उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नका

फटाके फोडताना 'या' गोष्टी टाळा – महापालिकेचे आवाहन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com