६ खलाशांसोबत बोट बेपत्ता

६ खलाशांसोबत बोट बेपत्ता

Published by :
Published on

निसार शेख
कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील नासीर हुसैनमियाँ संसारे यांच्या मालकीची मासेमारी करणारी "नावेद २" ही बोट तब्बल ६ खलाशांसह बेपत्ता आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने चिंतेच वातावरण आहे.

दरम्यान खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खाजगी बोटींकडून युद्धपातळीवर 'सर्च ऑपरेशन' हाती घेण्यात आले आहे. ही बोट २६ ऑक्टोबर  मंगळवारी सायंकाळी उशीरा जयगड मधून मासेमारी साठी समुद्रात गेली होती. तब्बल पाच दिवस ही बोट बेपत्ता आहे.

या बोटिवर दगडू तांडेल नामक मुख्य चालक असुन गोविंद नाटेकर, दत्ता, सूर्या, अनिल, अमोल हे चार खलाशी बोटिवर आहेत. हे सगळे गुहागर तालुक्यातील खलाशी आहेत.पोलीस, बंदर अधिकारी, मेरीटाईम बोर्ड आदी सागरी सुरक्षा यंत्रणा समन्वय ठेऊन असुन शोधकार्य सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com