मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी

विमानतळावरील सुरक्षा बंदोबस्त्त वाढ

मुंबई : सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशतवादाचे संकट निर्माण झाल आहे. मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली. ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून तातडीने संपूर्ण विमानतळाची तपासणी करण्यात आली आहे. तर, विमानतळावरील सुरक्षा बंदोबस्त्त आणखी वाढ केली आहे. यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई विमानतळावर विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये मुंबई विमानतळावरील इंडिगो फ्लाईट 6E6045 मध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगण्यात आले होते. हे विमान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हून म्हणजेच मुंबई ते अहमदाबाद असे रात्री प्रवास करणार होते. ही माहिती तातडीने विमानळ प्रधिकरणाने पोलिसांना दिली. याची गंभीर दखल घेत या विमानाची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने ते विमान रात्री उशिराने सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधीही मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकीचा मेसेज मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला होता. तर, एका पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही फोनवरुन देण्यात आली होती. यामुळे सणासुदीच्या काळात पोलिस यंत्रणा अधिक अलर्ट मोडवर आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com