NCP : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच दोन्ही राष्ट्रवादी घेणार मोठा निर्णय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार.
याबाबतचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना असणार असल्याची माहिती मिळत आहे. तुतारी चिन्हावर न लढता घड्याळ चिन्हावर लढण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती मिळत असून शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळत आहे.
Summary
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच दोन्ही राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार
हा निर्णय म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची नांदी ?
