महाराष्ट्र
मीरा भाईंदरमध्ये ९ वर्षीय मुलगा नाल्यातून वाहून गेल्याची घटना
महेंद्र वानखडे | मीरा भाईंदरमध्ये मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. अब्दुल रेहमान हुरेरा खान असे ९ वर्षीय मुलाचे नाव असून अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर त्याचा शोध घेत आहे.
मीरा भाईंदरच्या मुन्शी कंपाउंडमधील नाल्यात ९ वर्षीय अब्दुल रेहमान हुरेरा खान नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनने नागरिक आक्रमक झाले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर जवान त्याचा शोध घेत असून पावसामुळे शोध कार्यास अडथळा निर्माण होत आहे.