Breaking : मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Breaking : मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Published by :
Published on

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मात्र, सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यात, मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबईत आता कडक निर्बंध लादले जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच, येथील जे.जे रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com