महाराष्ट्र
Buldhana Accident : बुलढाण्यात दोन खासगी बस एकमेकांना धडकल्या;भीषण अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 जण जखमी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत.यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.