बुलडाण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, दुबईवरून आलेला ‘तो’ रूग्ण पॉझिटीव्ह

बुलडाण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, दुबईवरून आलेला ‘तो’ रूग्ण पॉझिटीव्ह

Published by :

संदीप शुक्ला, बुलडाणा | बुलडाणा जिल्हयात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रूग्ण दुबईवरून बुलडाण्यात आला असून त्याची ओमायक्रॉन चाचणी केली असता पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती तहसीलदार रूपेश खंडारे यांनी दिली.

दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या 65 वर्षीय व्यक्तिची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांना एकुण १४ दिवस विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे संबंधीत व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आहेत. मागील ९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे गृहस्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट आज 15 डिसेंबर रोजी प्राप्त झाला असून तो रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. बुलडाणेकरांना घाबरण्याची गरज नाही. परंतु नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन करावे अशे आवाहन बुलडाणा तहसीलदार रूपेश खंडारे यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com