Nashik : नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक रोखली; प्रचाराला न फिरण्याची धमकी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nashik ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे.
Summary
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले
नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक रोखली
आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक रोखून प्रचाराला न फिरण्याची धमकी
