Candidate Symbol
Candidate Symbol

Candidate Symbol : उमेदवारांना आता निवडणूक चिन्हाची प्रतीक्षा; अपक्ष उमेदवारांसाठी 190 पेक्षा जास्त चिन्हे उपलब्ध

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Candidate Symbol) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.

आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. काल उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आता उमेदवारांना निवडणूक चिन्हाची प्रतीक्षा लागली आहे.

अपक्ष उमेदवारांसाठी 190 पेक्षा जास्त चिन्हे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसह विविध प्रकारच्या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. 3 तारखेला उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून फळांसह आणि जेवणाच्या थाळीचा चिन्हांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Summery

  • उमेदवारांना आता निवडणूक चिन्हाची प्रतीक्षा

  • अपक्ष उमेदवारांसाठी 190 पेक्षा जास्त चिन्हे उपलब्ध

  • खाद्यपदार्थांसह विविध प्रकारच्या चिन्हांचा समावेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com