वर्ध्यात देवदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार 4 जण जखमी

वर्ध्यात देवदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार 4 जण जखमी

Published by :
Published on

भूपेश बारंगे, वर्धा | वर्ध्यात नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा कारंजा (घाडगे) जवळ वाहनचालकाचा नियंत्रण सुटल्याने रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात एक जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग सहावर कारंजा शहरात उड्डाणपूलचे काम सुरू आहे. त्याकरिता रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. नागपूरकडून येणाऱ्या वाहनाला अचानक सर्व्हीस रोडवर वळण घ्यावे लागत असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनाचे अनेकदा अपघातच्या घटना घडल्या आहे. झांडू कंपनी कडून बनविण्यात येणाऱ्या उड्डाणपूल काम सूरु असून काही अंतरावर सूचना फलक व दिशा फलक लावणे अनिवार्य असून येथे कोठेही सूचना फलक लावण्यात आले नाही त्यामुळे महामार्गवर भरधाव येणाऱ्या वाहन चालकांना अचानक कामे सुरू असल्याचे दिसत असल्याने अपघात घटना घडत आहे.

आज झालेल्या अपघात कार भरधाव वेगाने येत असल्याने अचानक वाहनाचे वेग कमी करत असताना चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात विष्णू शिवणकर यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक हंसराज डांगरे, अविनाश काटंनकर ,अरुणा काटनकर हे गंभीर जखमी झाले असून शेवतां जाधव ह्या किरकोळ जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com