शिंदे-फडणवीस-पवार यांच्या व्हिडीओवरील 'ते' कार्टून व्हायरल
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ असून यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कार्टूनिस्ट आलोक यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर व्यंगात्मक चित्र रेखाटले आहे.
कार्टूनिस्ट आलोक यांच्या पोस्टमध्ये शिंदे-फडणवीस-पवार दाखविले आहेत. यात एकनाथ शिंदे आपल्याला काय? बोलायचंय आणि निघून जायचंय. बोलून मोकळं व्हायचं, असे म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर अजित पवार हो……येस, श्श...ऐकू जातंय, असं बोलताना दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माईक चालू आहे, असे म्हणत आहे. त्यांच्या पुढील लोक व्हिडीओ पण बनतोय, फॉरवर्ड पण केला, व्हायरल झाला पण, असे बोलताना दिसत आहेत. हे कार्टून आता सोशल मीडियावर आता व्हायरल होत असून युजर्स आलोक यांचे कौतुक करत आहेत.
