Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण; संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
(Sanjay Gaikwad ) आमदार निवासमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातल्याचे पाहायला मिळाले. संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये संजय गायकवाड आमदार निवास कँटिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसले.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जेवण देण्यात आलं मात्र जेवणात देण्यात आलेला डाळ आणि भात खराब असून त्याचा वास येत असल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर आता आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह आणखी एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५), कलमाअंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांत हा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.