Nilesh Ghaiwal
Nilesh Ghaiwal

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nilesh Ghaiwal) निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली. निलेश घायवळ याचा नंबरकारी असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडले असल्याची माहिती मिळत आहे.

यातच आता गुंड निलेश गायवळ टोळीतील गुंडासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट कागदपत्रांद्वारे पिस्तूल परवाना घेतल्याचे उघड झाले आहे. अजय सरोदे याच्यासह शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय सरोदे याच्या घरात चारशे काडतूस सापडली त्यापैकी 200 जिवंत काडतुस असल्याची माहिती समोर आली असून 2024 मध्ये अजय सरोदे याला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला होता. मात्र सरोदे याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी येरवडा येथे राहत असल्याचा सांगत अर्ज दिला होता. मात्र आता पोलीस तपासामध्ये तो येरवड्यात राहत नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 Nilesh Ghaiwal
Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ याचा नंबरकारी असलेल्या अजय सरोदे याच्या घरी सापडले तब्बल 400 काडतूस

Summery

  • गुंड निलेश गायवळ टोळीतील गुंडासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • बनावट कागदपत्रांद्वारे पिस्तूल परवाना घेतल्याचे उघड

  • अजय सरोदे याच्यासह शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com