Kamothe Cash Seized : कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Kamothe Cash Seized ) कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पनवेल महानगरपालिका निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पनवेलजवळील कामोठे चेकनाका येथे नियमित वाहन तपासताना सायन पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या ग्रॅन्ड विटारा पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी केली. यात कापडी पिशवीमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती मिळत आहे.
प्रभाग 11, 12, 13 चे निवडणूक निर्णय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याद्वारे ही तक्रार देण्यात आली. ही रक्कम संशयास्पद असल्याने पथकामार्फत जप्त करण्यात आली असून आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाकडून तपास यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
कामोठे चेकनाका येथे सतरा लाखांची रोकड जप्त
पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या ग्रॅन्ड विटारा पांढऱ्या रंगाच्या गाडीची तपासणी
रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त
