अभिनेत्री कडे शरीर सुखाची मागणी; मनसेने दिला चोप
सिनेक्षेत्रात अभिनेत्रींकडून अभिनयाच्या नावाखाली शरीरसुखाच्या मागणीच्या असंख्य घटना समोर येत होत्या, त्यातच आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका अभिनेत्रीकडून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विकृतांना मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी या प्रकरणाची माहिती दिली.
प्रकरण काय आहे?
एका अभिनेत्रीला कास्टिंग डिरेक्टर चा फोन आला, तुमचं फिल्म मध्ये सिलेक्शन झालं आहे. तुम्हाला जर सिनेमात लीड रोल हवा असेल तर लखनऊवरुन येणाऱ्या निर्मात्याला खुश करावं लागेल, म्हणजेच कॅाम्प्रमाईझ करावं लागेल, तिने हि बाब आपल्या कुटुंबाच्या कानावर घातली असता, कुटुंबीयांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणेंकडे संपर्क करुन ही बाब सांगितली, त्यानंतर विकृतांनी त्याअभिनेत्रीला ओबेरॉय मॅाल वर भेटायला बोलावल, आणि तिला ठाणे घोडबंदर रोड वरील एका फार्म हाउस ला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी ट्रॅप केला आणि चोप देऊन पोलिसांकडे सोपवलं.
गिरिजेश यादव,बिरालाल यादव,राहुल यादव आणि कंचन यादव अस या विकृतांच नाव असून यांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. तपास केला असता या विकृतांकडे कट्टे सापडल्याच समोर आल आहे.

